Monsoon Update: महाराष्ट्र राज्यात काही विभागांमध्ये चांगला पाऊस झाला आहे तर काही विभागांमध्ये शेतकरी अजून देखील चांगल्या पावसाची वाट बघत आहे व अशातच महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पावसाने दडी मारल्यामुळे बळीराजा चिंतातूर झाला आहे. अशातच हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात सरासरीच्या 23 टक्के कमी पाऊस पडला आहे. महाराष्ट्र राज्यात अजून देखील चांगल्या पावसाची गरज आहे व अशातच मराठवाड्यामध्ये सरासरीच्या तुलनेत 38% कमी पाऊस पडला आहे.
महाराष्ट्रात कोणत्या विभागात किती पाऊस.
मराठवाड्यामध्ये सरासरी 188 मिलिमीटर पाऊस हा दहा जुलै पर्यंत पडत असतो मात्र यावर्षी मराठवाड्यामध्ये दहा जुलै पर्यंत फक्त 116 मिलिमीटर पाऊस पडला आहे अशी माहिती हवामान विभागामार्फत समोर येत आहे. महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक भयानक स्थिती हिंगोली जिल्ह्यात निर्माण झाले आहे कारण तेथे सरासरीच्या तुलनेत 83 टक्के पाऊस कमी आहे. दरवर्षी हिंगोली मध्ये १० जुलैपर्यंत 210 मिलिमीटर पावसाची नोंद होते परंतु यावर्षी फक्त 41.06 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
विदर्भातील पावसाची सद्यस्थिती
यावर्षी विदर्भामध्ये चांगला पाऊस झाला आहे परंतु तरीपण विदर्भामध्ये पावसाने सरासरी काढलेली नाही दरवर्षी विदर्भामध्ये 266.09 मिमी पावसाचे नोंद होत असते परंतु यावर्षी विदर्भामध्ये 180 मिमी पाऊस पडला आहे. विदर्भ मधील अकोल्यात सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस पडला आहे. दरवर्षी अकोला मध्ये 209.06 मिमी पाऊस नोंदिवला जातो पण यावर्षी अकोला मध्ये 66 मिमी पाऊस झाल्याची माहिती हवामान विभागामार्फत देण्यात आली आहे.
मध्य महाराष्ट्रात किती पडलाय पाऊस
मध्य महाराष्ट्रात आतापर्यंत 162 मिमी पावसाची नोंद झाली आहे हा पाऊस दरवर्षीच्या तुलनेत 29 टक्के कमी आहे. सांगली मध्ये देखील अजून चांगला पाऊस झाला नाही सांगलीमध्ये आत्तापर्यंत सरासरीच्या तुलनेत 71 टक्के कमी पाऊस झाला आहे. सांगलीमध्ये दहा जुलै पर्यंत 47 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे परंतु दरवर्षी सांगलीमध्ये सरासरी 161 मिमी पाऊस नोंदवला जातो.
कोकणात किती पडला पाऊस
महाराष्ट्र राज्यातील इतर भागांच्या तुलनेमध्ये कोकणामध्ये यावर्षी थोडासा चांगला पाऊस झाला आहे. दरवर्षी कोकणामध्ये 1140 मिलिमीटर पाऊस पडत असतो परंतु यावर्षी कोकणामध्ये 1149 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आला आहे. हा पाऊस दरवर्षीच्या तुलनेत एक टक्का जास्त आहे. कोकणात चांगला पाऊस झाला असला तरी कोकणामध्ये पावसामध्ये तफावत आढळून येत आहे. रत्नागिरीमध्ये सरासरीच्या तुलनेत 18% कमी पाऊस झाला आहे तर मुंबईमध्ये सरासरी च्या तुलनेत 39 टक्के कमी पाऊस झाला आहे.
महाराष्ट्रात पेरण्या खोळंबल्या, अनेक ठिकाणी पावसाचा अभाव
महाराष्ट्र मध्ये काही ठिकाणी चांगला पाऊस झाला आहे तर काही ठिकाणी अजून देखील चांगला पाऊस झालेला नाही त्यामुळे महाराष्ट्रात पेरण्या खोळंबल्या आहेत व शेतकरी पावसाची वाट बघत आहेत. महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पावसाने दडी मारली आहे. सध्याच्या स्थितीमध्ये कोकणामध्ये चांगला पाऊस पडत आहे. ठाणे, मुंबई उपनगर सह मुंबई शहरात पाऊस पडत आहे व विदर्भातील अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे.
दररोज चा हवामान अंदाज व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करून ग्रुप जॉईन करा
0 Comments
Do not spam here