Search Bar

Featured Posts

Havaman Andaj: आजचा हवामान अंदाज, दुपारनंतर या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार

Havaman Andaj: आज दुपारनंतर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार तर काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. म्हणूनच आजच्या या पोस्टमध्ये आपण महाराष्ट्रात कुठे पाऊस पडणार आहे याची माहिती जाणून घेऊया छोटीशी अपडेट आहे त्यामुळे ही अपडेट पूर्ण वाचा.

आज दुपारी आणि दुपारनंतर महाराष्ट्राच्या उत्तरे भागांमध्ये पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होईल व त्यानंतर संध्याकाळपर्यंत हे वातावरण दक्षिण भागाकडे सरकेल व त्यामुळे तिथे देखील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे.

आज दुपारनंतर धुळे आणि धुळे चा पूर्वी परिसर पाचोरा, जळगाव, शिरपूर या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. बुऱ्हाणपूर आणि आसपासच्या परिसरामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे तसेच काही भागांमध्ये हलक्या पाऊस होण्याची शक्यता आहे.

Havaman andaj

महाराष्ट्र राज्याच्या उत्तर परिसरामध्ये जसे की नवापूर, साक्री, नंदुरबार तसेच आसपासच्या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण बघायला मिळेल. दुपारी आणि दुपारनंतर अमरावती विभागामध्ये मुख्यत्वे करून अकोला, बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये पावसाला सुरुवात होईल. यवतमाळ आणि वाशिम च्या काही परिसरामध्ये पावसाचा जोर राहील मुख्यते करून वाशिम च्या उत्तरी परिसरामध्ये पावसाचा जोर बघायला मिळेल.

महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार

नागपूर विभागामध्ये नागपूर, भंडारा, वर्धा, गोंदिया या चार-पाच जिल्ह्यांमध्ये विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण निर्माण होताना बघायला मिळत आहे. नागपूर आणि वर्धा च्या पूर्वी परिसरामध्ये पावसाचा जोर जास्त राहील.

मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर जोरदार पावसाची शक्यता आहे. परभणी मध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे तसेच छत्रपती संभाजीनगर आणि जालना या जिल्ह्यांमध्ये देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

दुपारनंतर या जिल्ह्यांमध्ये होणार पाऊस

दुपारनंतर अहमदनगरच्या पूर्वी परिसरामध्ये पाथर्डी, भगूर,कडा, जामखेड येथे मध्यम पावसाची शक्यता आहे तसेच आसपासच्या काही परिसरामध्ये देखील चांगला पाऊस होऊ शकतो. श्रीरामपूरचा एकदम कडेचा पूर्वी परिसर गंगापूर वगैरे या भागांमध्ये आज पाऊस होण्याची शक्यता आहे. कोपरगाव च्या पूर्वी परिसरामध्ये हलक्या ते मधील स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. कोपरगावच्या पश्चिम परिसरामध्ये जसे की निफाड, सिन्नर, संगमनेर या भागात ठिकठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे.

आज दुपारनंतर नाशिक आणि नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये पावसाचा जोर कमी राहण्याची शक्यता आहे. ठिकठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. पुणे विभागामधील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांच्या कोकणालगतच्या भागांमध्ये पाऊस बघायला मिळेल इतरत्र हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल. सोलापूर मध्ये काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्‍यता आहे ज्यामध्ये पंढरपूर, इंडी, जत या ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल


Post a Comment

0 Comments

x