IMD Update: आज दक्षिण कोकणामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पाऊस शक्यता आहे तसेच कोकणालगतच्या भागांमध्ये देखील बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस, तर काही काही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामध्ये चिपळूण, रत्नागिरी, गोरेगाव, खोपोली, पुण्याच्या आसपासच्या परिसरामध्ये मुख्यतेकरून उत्तरी परिसरामध्ये पावसात जोर राहील.
दुपार आणि दुपारनंतर या भागांमध्ये पावसात जोर वाढणार आहे तसेच इकडे जुन्नर, मंचर या परिसरात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता दुपारनंतर आहे.
आजचा हवामान अंदाज, विविध जिल्ह्यात जोरदार पाऊस IMD Update
नाशिकच्या पश्चिम पट्ट्यांमध्ये देखील आज काही ठिकाणी पावसात जोर वाढण्याची शक्यता आहे. त्यामध्ये त्रंबक, इगतपुरी वगैरे यातला पश्चिम परिसर मध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे.
उत्तर कोकणामध्ये विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण राहील. ठीक ठिकाणी हलक्या-मध्यम पावसाची शक्यता. उत्तर महाराष्ट्र मध्ये देखील आज दुपारी आणि दुपारनंतर बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार आहे. नंदुरबार, धुळे, जळगाव संपूर्ण भागांमध्ये दुपारनंतर पावसाचा प्रभाव राहील. हलका मध्यम तर काही भागांमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.
कोकण आणि मराठवाडा हवामान अंदाज
कोकण विभाग आणि कोकणालगतचा भाग, पुण्याचा पश्चिम भाग यात पावसाचे वातावरण निर्माण होईल हेच वातावरण रात्रीपर्यंत पूर्वेकडे सरकत येणार आहे. त्यामुळे पूर्वी भागात काही ठिकाणी खूप जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यामध्ये पुणे, अहमदनगर, मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांमध्ये आज जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
आज मित्रांनो मराठवाड्यात संध्याकाळपर्यंत बऱ्याच ठिकाणी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. त्यामध्ये वैजापूर, कोपरगावच्या पूर्वी भागांमध्ये, श्रीरामपूर, गंगापूर, जालन्याचा उत्तरी परीसर, देऊळगाव राजा, सिल्लोड, मोहरा, चिखली, कन्नड, या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार तर काही काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. एखाद्या ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस देखील या परिसरामध्ये काही भागांमध्ये होऊ शकतो.
विदर्भ हवामान अंदाज
बीड तसेच परभणी, लातूर, नांदेड, धाराशिव या भागांमध्ये विखुरलेल्या स्वरूपात हलक्या मध्यम पावसाचे वातावरण राहील. रात्रीपर्यंत काही ठिकाणी या परिसरात देखील पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. त्यामध्ये मुख्यतवेकरून नांदेड आणि आसपासच्या परिसरामध्ये, हिंगोली, परभणीच्या काही परिसरामध्ये रात्रीपर्यंत बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.
हे जे वातावरण आहे ते मराठवाड्याच्या उत्तरी भागामध्ये बनणार आहे. हे वातावरण रात्रीपर्यंत दक्षिण पूर्व भागाकडे सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे नांदेड, लातूर, धाराशिव, हिंगोली जिल्हा या भागांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.
पुणे विभाग हवामान अंदाज
आज पुणे विभागामध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापुर, यांच्या पूर्वी परिसरामध्ये देखील काही काही ठिकाणी आज पाऊस बघायला मिळेल. पावसाचा जोर कमी राहील परंतु काही काही ठिकाणी हलका मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे.
अमरावती तसेच नागपूर विभाग हवामान अंदाज
दुपारनंतर अमरावती विभाग आणि नागपूर विभागामध्ये संध्याकाळपर्यंत काही ठिकाणी पावसाचे वातावरण होईल. त्यामध्ये नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. अमरावती विभागामध्ये वाशिम आणि यवतमाळच्या काही परिसरात संध्याकाळपर्यंत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बुलढाणा आणि अकोला च्या परिसरामध्ये संध्याकाळपर्यंत काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
0 Comments
Do not spam here